Discover Nashik Kumbh loader image

D

I

S

C

O

V

E

R

N

A

S

H

I

K

K

U

M

B

H

नाशिक कुंभ २०२७ स्पर्धा महोत्सवाबाबत अधिक माहिती, सहभाग, तांत्रिक मदत किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आमची टीम आपल्याला आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

शिवालय, २८८/५/३ फाळके स्मारकाजवळ, पांडवलेणी,
नाशिक – ४२२०१० (महाराष्ट्र)

रजिस्टर करा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७

३१ऑक्टोबर २०२६

डिस्कव्हर नाशिक फोटोग्राफी स्पर्धा

नाशिकचा समृद्ध इतिहास, सुंदर निसर्ग, धार्मिक स्थळे, स्थानिक संस्कृती आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील खास क्षण तुमच्या कॅमेऱ्यातून टिपा. तुमच्या नजरेतून नाशिकचे वेगळेपण, येथील परंपरा आणि नाशिकशी जोडलेले नाते जगासमोर आणा. तुमचे छायाचित्र नाशिकची एक नवी ओळख निर्माण करू शकते!

  • प्रकार: छायाचित्र (Photography)

  • फॉरमॅट: JPG / PNG

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

डिस्कव्हर नाशिक रील स्पर्धा

तुमच्या मोबाईलमधून दाखवा नाशिकची एक वेगळी ओळख! नाशिकचा समृद्ध इतिहास, सुंदर ठिकाणे, स्थानिक संस्कृती, परंपरा, मंदिरे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचे खास क्षण तुमच्या क्रिएटिव्ह रीलमधून सादर करा. तुमची कल्पकता आणि तुमची खास शैली वापरून नाशिकचे वेगळेपण जगभर पोहोचवा!

  • प्रकार: रील / शोर्ट व्हिडिओ

  • फॉरमॅट: MP4

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

चला, नाशिक कुंभाचा अनुभव घेऊया

तुमच्या व्हिडिओ, रील, फोटो किंवा पोस्टरमधून नाशिक कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, परंपरा, संस्कृती आणि भक्तीमय वातावरण जगासमोर आणा आणि लोकांना या सोहळ्याशी जोडून घ्या. अनोख्या सोहळ्याची ओळख जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करा.

  • प्रकार: रील / व्हिडिओ / क्रिएटिव्ह पोस्ट

  • फॉरमॅट: MP4 / JPG / PNG

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

हिडन जेम्स ऑफ नाशिक

नाशिकमध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य जागा आहेत, ज्यांची माहिती अनेकांना नाही. रील, व्हिडिओ, छायाचित्र या खास गोष्टी जगासमोर आणा. नाशिकचे न पाहिलेले रूप शोधा आणि तुमच्या कल्पनेतून इतरांनाही ते अनुभवण्याची संधी द्या.

  • प्रकार: फोटो / रील / व्हिडिओ /

  • फॉरमॅट: JPG / PNG / MP4 / PDF

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

कुंभ Canvas

तुमच्या कलेतून साकार करा सिंहस्थ कुंभमेळ्याचे अद्भुत विश्व! कुंभमेळ्याची श्रद्धा, आध्यात्मिकता, परंपरा, साधू-संतांचे जीवन, भक्तीमय वातावरण आणि सांस्कृतिक वैभव यांना तुमच्या कल्पकतेतून कलात्मक रूप द्या.

  • प्रकार: पेंटिंग / स्केचिंग / आर्टवर्क

  • फॉरमॅट: JPG / PNG / PDF

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

माझी कुंभयात्रा

कुंभमेळा म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर श्रद्धा, भावना, अनुभव आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणींचा प्रवास आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याशी जोडलेले तुमचे खास क्षण, वैयक्तिक अनुभव, प्रवासातील आठवणी व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणा.

  • प्रकार: स्टोरी / व्हिडीओ

  • फॉरमॅट: MP4 / JPG / PNG / PDF

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

कुंभ- व्यवसाय आणि रोजगार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या व्यवसाय, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी शोधा. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपायांमधून स्थानिक विकासाला कशी चालना मिळू शकते, हे दाखवा.

  • प्रकार: व्यवसाय कल्पना / प्रेसेंटेशन / व्हिडिओ

  • फॉरमॅट: PDF / PPT / MP4 / DOCX

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

अनटोल्ड स्टोरी ऑफ कुंभ

कुंभमेळ्याच्या इतिहासात अशा अनेक कथा, परंपरा, आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भ दडलेले आहेत, जे अजूनही अनेकांसाठी अपरिचित आहेत. समुद्रमंथनाच्या पौराणिक कथांपासून कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक प्रवासापर्यंत, चारही कुंभस्थळांचे वैशिष्ट्य, साधू-संतांच्या परंपरा आणि या महापर्वाशी जोडलेल्या दुर्लक्षित गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचवा.

  • प्रकार: स्टोरी / आर्टिकल / व्हिडीओ

  • फॉरमॅट: PDF / DOC / MP3 / MP4

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

नाशिक स्टोरी / निबंध / ब्लॉग लेखन

शब्दांतून उलगडा नाशिकचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा, धार्मिक महत्त्व, निसर्गसौंदर्य आणि स्थानिक जीवन! नाशिकची ओळख घडवणाऱ्या परंपरा, ऐतिहासिक स्थळे, पर्यटनाची वैशिष्ट्ये आणि सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध पैलूंवर निबंध किंवा ब्लॉग लिहा आणि नाशिकची एक वेगळी ओळख वाचकांसमोर आणा.

  • प्रकार: निबंध / आर्टिकल / ब्लॉग लेखन

  • फॉरमॅट: PDF / DOCX

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

नाशिक - टेस्ट आणि ट्रेक

नाशिकच्या गड-किल्ल्यांपासून सह्याद्रीच्या डोंगरवाटांपर्यंत आणि निसर्गरम्य ठिकाणांपासून ऐतिहासिक पाऊलखुणांपर्यंत, नाशिकचा अनोखा अनुभव घ्या! तुमच्या ट्रेकिंग मोहिमेतून येथील इतिहास, निसर्गसौंदर्य, भटकंतीचे मार्ग आणि साहसाची अनुभूती व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणा.

  • प्रकार: रील / व्हिडिओ

  • फॉरमॅट: MP4

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

कुंभ सांस्कृतिक महोत्सव

तुमच्या कलेतून साजरा करा सिंहस्थ कुंभमेळ्याचा सांस्कृतिक वारसा! लोकनृत्य, संगीत, भक्तिगीते, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे वैभव जगासमोर आणा आणि परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा.

  • प्रकार: लोकनृत्य / संगीत / गायन / सांस्कृतिक सादरीकरण / लोककला

  • फॉरमॅट: MP4 / MP3 / JPG / PNG / PDF

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

नाशिकचा आवाज आणि पॉडकास्ट

प्रत्येक शहराला स्वतःचा आवाज असतो आणि त्या आवाजात दडलेल्या असतात अनेक कथा, अनुभव आणि विचार! नाशिकमधील स्थानिक लोकांच्या मुलाखती, शहराचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा, नाशिकची वैशिष्ट्ये आणि सिंहस्थ कुंभमेळ्याविषयीचे अनुभव पॉडकास्ट, संवाद किंवा कथाकथनाच्या माध्यमातून सादर करा. तुमच्या आवाजातून नाशिकची ओळख, लोकांचे विचार आणि कुंभमेळ्याचे महत्त्व जगासमोर आणा.

  • प्रकार: पॉडकास्ट / मुलाखत

  • फॉरमॅट: MP3 / WAV / MP4

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

३१ऑक्टोबर २०२६

एक कुंभ, चार स्थळे

भारतातील चार प्रमुख कुंभस्थळांचा अनोखा प्रवास तुमच्या नजरेतून सादर करा! नाशिक, प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन येथील धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक वारसा, स्थानिक संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभव यांचा शोध घ्या. रील, व्हिडिओ, फोटो स्टोरी किंवा प्रवासवर्णनाच्या माध्यमातून या चारही स्थळांमधील वेगळेपण आणि कुंभपरंपरेतील एकात्मता लोकांसमोर आणा.

  • प्रकार: रील / व्हिडिओ / फोटो स्टोरी

  • फॉरमॅट: MP4 / JPG / PNG / PDF

  • भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी