Discover Nashik Kumbh loader image

D

I

S

C

O

V

E

R

N

A

S

H

I

K

K

U

M

B

H

नाशिक कुंभ २०२७ स्पर्धा महोत्सवाबाबत अधिक माहिती, सहभाग, तांत्रिक मदत किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आमची टीम आपल्याला आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

शिवालय, फाळके स्मारकाजवळ, पांडवलेणी,
नाशिक – ४२२०१० (महाराष्ट्र)

Discover Nashik Kumbh | नाशिक कुंभाची ओळख, तुमच्या प्रतिभेतून

  • सिंहस्थ कुंभमेळा २०२७ | श्रद्धा • संस्कृती • अध्यात्म • वारसा

पुरस्कार चिन्ह

पुरस्कार

0+

विविध स्पर्धा आणि वयोगटांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी विशेष पुरस्कार.

गिफ्ट व्हाऊचर चिन्ह

गिफ्ट व्हाऊचर्स

0+

विजेते आणि निवडक सहभागींसाठी आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स आणि विशेष भेटवस्तू.

विशेष गौरव चिन्ह

विशेष गौरव

0+

उत्कृष्ट कल्पना, सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि प्रभावी अभिव्यक्तीसाठी विशेष सन्मान.

स्पर्धा विभाग चिन्ह

विविध स्पर्धा | ५ सहभागी गट

0+

सहभागी गटांसाठी कला, साहित्य, छायाचित्रण, व्हिडिओ आणि सर्जनशीलतेच्या विविध स्पर्धा.

तुमच्या प्रतिभेतून आकार घेईल नाशिक कुंभाची नवी ओळख

सिंहस्थ कुंभ २०२७ हा केवळ एक धार्मिक पर्व नाही, तर नाशिकचा वारसा, संस्कृती, पर्यटन, अध्यात्म आणि ओळख जगासमोर मांडण्याची ऐतिहासिक संधी आहे. या महान पर्वाच्या ब्रँडिंगमध्ये देशभरातील विद्यार्थी, कलाकार, लेखक, छायाचित्रकार, डिझाइनर्स आणि सर्जनशील व्यक्तींना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने नाशिक कुंभ २०२७ स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तुमचे छायाचित्र नाशिकचे सौंदर्य जगासमोर आणू शकते. तुमचा व्हिडिओ सिंहस्थाचे वैभव लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तुमची कलाकृती किंवा लेखन नाशिक आणि कुंभाची नवी ओळख घडवू शकते. प्रत्येक सहभाग ही केवळ स्पर्धेतील एन्ट्री नसून नाशिक आणि सिंहस्थाच्या ब्रँडिंगमधील एक महत्त्वाची भूमिका आहे.

विविध स्पर्धा आणि वयोगटांमधील उत्कृष्ट सहभागींना ५००+ विशेष पुरस्कार, १०००+ गिफ्ट व्हाऊचर्स, गौरव प्रमाणपत्रे आणि विशेष सन्मानाची संधी उपलब्ध आहे. यासोबतच निवडक कलाकृती, छायाचित्रे, व्हिडिओ आणि साहित्यकृतींना व्यापक प्रसिद्धी मिळणार आहे. तुमच्या सर्जनशीलतेतून नाशिकची ओळख अधिक समृद्ध करा, सिंहस्थाचे वैभव जगापर्यंत पोहोचवा आणि या ऐतिहासिक पर्वाच्या ब्रँडिंगचा अभिमानास्पद भाग बना.

सहभागी गट

प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्र संधी आणि स्वतंत्र गौरव.

प्राथमिक गट

लहानग्यांच्या कल्पनाशक्ती, रंग आणि सर्जनशीलतेतून नाशिक व सिंहस्थाचे विश्व अनुभवण्याची संधी.

माध्यमिक गट

उत्साह, जिज्ञासा आणि नव्या विचारांतून नाशिक व सिंहस्थाची ओळख सर्जनशीलपणे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

महाविद्यालयीन गट

नव्या पिढीच्या दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रभावी अभिव्यक्तीतून नाशिक व सिंहस्थाची नवी ओळख घडविणाऱ्यांसाठी.

खुला गट

कला, विचार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून नाशिक व सिंहस्थाचे वैभव आपल्या शैलीत मांडण्याचे व्यासपीठ.

ज्येष्ठ नागरिक गट

अनुभव, परंपरा, संस्कार आणि आठवणींच्या माध्यमातून सिंहस्थाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्यांसाठी.

प्रत्येक गटासाठी आकर्षक बक्षिसे

प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक सहभागी गटामध्ये:

प्रथम क्रमांक

विविध स्पर्धा आणि वयोगटांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी विशेष पुरस्कार.

द्वितीय क्रमांक

विजेते आणि निवडक सहभागींसाठी आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स.

तृतीय क्रमांक

उत्कृष्ट प्रयत्न, सर्जनशील दृष्टिकोन आणि विषयाची प्रभावी मांडणी करणाऱ्या सहभाग्याला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात येईल.

उत्तेजनार्थ

विशेष कल्पकता, वेगळी संकल्पना किंवा उल्लेखनीय सादरीकरणासाठी उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.