नाशिक कुंभ २०२७ स्पर्धा महोत्सवाबाबत अधिक माहिती, सहभाग, तांत्रिक मदत किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आमची टीम आपल्याला आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

शिवालय, २८८/५/३ फाळके स्मारकाजवळ, पांडवलेणी,
नाशिक – ४२२०१० (महाराष्ट्र)

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७

नाशिक-त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ कुंभ २०२७

गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले नाशिक हे श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचा समृद्ध वारसा जपणारे शहर आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या निमित्ताने नाशिकची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख जगभर पोहोचविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. फोटोग्राफी, व्हिडिओ, कला, डिझाईन आणि लेखनाच्या माध्यमातून या भव्य पर्वाचा भाग बना आणि नाशिक व कुंभाची कथा आपल्या दृष्टीकोनातून जगासमोर मांडा.

  • सहभागी स्पर्धक १
  • सहभागी स्पर्धक २
  • सहभागी स्पर्धक ३
  • सहभागी स्पर्धक ४
  • १४+

सिंहस्थ २०२७ च्या या भव्य पर्वात सहभागी व्हा

नाशिक सिंहस्थ कुंभ २०२७

इतिहास, आस्था आणि नव्या क्षितिजांकडे वाटचाल

अधिक जाणून घ्या

श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव

अधिक जाणून घ्या
Discover Nashik Kumbh hero shape
कुंभनगरीचा गौरव

भारताच्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक पर्वाला तुमच्या कल्पनांची जोड द्या

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेली आणि ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे अधिष्ठान लाभलेली नाशिक नगरी २०२७ मध्ये पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. श्रद्धा, अध्यात्म, संस्कृती आणि सनातन परंपरेच्या या भव्य पर्वाच्या निमित्ताने नाशिकची ओळख आणि कुंभाचे वैभव जगासमोर मांडण्याचा हा सामूहिक प्रयत्न आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर - सिंहस्थ कुंभ २०२७

२०२७ नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभाला तुमच्या कल्पनांचा स्पर्श

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नाही, तर नाशिकच्या समृद्ध वारशाला, परंपरेला आणि ओळखीला नव्या पिढीशी आणि जगाशी जोडणारी एक ऐतिहासिक संधी आहे. या पर्वाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धा महोत्सव हा प्रत्येकाला या प्रवासाचा भाग बनण्याचे खुले आमंत्रण आहे. प्रत्येक व्यक्ती नाशिककडे वेगळ्या नजरेने पाहते. कोणाला गोदावरीच्या घाटांतील शांतता दिसते, कोणाला त्र्यंबकेश्वराचे अध्यात्म जाणवते, तर कोणाला नाशिकचा इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि लोकजीवन प्रेरणा देते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनात कुंभाविषयी वेगळी भावना, वेगळी कथा आणि वेगळा अनुभव असतो.

या स्पर्धा महोत्सवात नाशिककर, विद्यार्थी, युवा, महिला, कलाकार, छायाचित्रकार, लेखक, कंटेंट क्रिएटर्स तसेच सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात. फोटोग्राफी, व्हिडिओ, कला, डिझाईन आणि लेखनाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या दृष्टीकोनातून नाशिक आणि कुंभाची कथा मांडण्याची संधी उपलब्ध आहे. ही केवळ स्पर्धा नाही, तर नाशिकच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवाला नव्या स्वरूपात जगासमोर सादर करण्याचा एक लोकसहभागी प्रयत्न आहे. प्रत्येकाला नाशिक वेगळे दिसते, प्रत्येकाला कुंभ वेगळा जाणवतो. तुमच्या मनातील नाशिक आणि तुमच्या नजरेतील कुंभ जगासमोर मांडण्यासाठी हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे.

Discover Nashik Kumbh participants
Competition icon
१४

एकूण स्पर्धा

फोटोग्राफी, व्हिडिओ, कला, डिझाईन आणि लेखन अशा विविध क्षेत्रांतील स्पर्धा.

Competition icon
५

सहभागी गट

प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, खुला आणि ज्येष्ठ नागरिक गट.

Competition icon
३०२७

आकर्षक पारितोषिके

विविध स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा दाखवा आणि डिस्कव्हर नाशिक कुंभ २०२७ मधील आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी मिळवा.

Competition icon
५

पारितोषिके कॅटेगरी

प्रत्येक गटासाठी आकर्षक बक्षिसे-प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक सहभागी गटामध्ये.

Discover Nashik Kumbh campaigns shape
१२ वर्षांनी अवतरतो श्रद्धेचा महासंगम

जिथे इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि आधुनिक विकास एकत्र येतात

पवित्र गोदावरीच्या तीरावर वसलेले नाशिक हे भारतातील सर्वात प्राचीन, पवित्र आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. रामायणकालीन पंचवटी, रामकुंड, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी गड आणि संत परंपरेचा समृद्ध वारसा यांमुळे नाशिकला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

परंतु नाशिकची ओळख केवळ तीर्थक्षेत्रापुरती मर्यादित नाही. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही नाशिकने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. भारताची द्राक्ष राजधानी, कांदा व्यापाराचे प्रमुख केंद्र, वाईन पर्यटनाचे अग्रगण्य ठिकाण आणि सांस्कृतिक वैभव जपणारे शहर अशी नाशिकची बहुआयामी ओळख आहे.

सिंहस्थ कुंभ २०२७ च्या निमित्ताने जगभरातील लाखो भाविक, पर्यटक, संशोधक आणि सर्जनशील व्यक्तींचे लक्ष नाशिककडे वेधले जाणार आहे. हीच योग्य वेळ आहे नाशिकचा इतिहास, वारसा, निसर्ग, पर्यटन आणि आधुनिक विकास देशभर तसेच जागतिक स्तरावर प्रभावीपणे पोहोचवण्याची.

नाशिकची ओळख जगासमोर आणणारा लोकसहभागी उपक्रम.

नाशिक वारसा
Discover Nashik Kumbh campaigns shape top
Discover Nashik Kumbh campaigns shape bottom
कला • सृजन • अभिव्यक्ती

तुमच्या प्रतिभेला मिळो नवे व्यासपीठ

फोटोग्राफी, व्हिडिओ, कला, डिझाईन आणि लेखनाच्या माध्यमातून नाशिक आणि सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.

०१

डिस्कव्हर नाशिक कुंभ स्पर्धा

डिस्कव्हर नाशिक कुंभ २०२७ च्या स्पर्धांमधील नोंदणी, कलाकृती सादर करणे, परीक्षण, निकाल आणि विजेत्यांच्या घोषणेच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

  • १४ सर्जनशील स्पर्धा

  • फोटोग्राफी | रील | आर्ट | लेखन

  • तुमच्या कलाकृतीला जागतिक व्यासपीठ

०२

स्पर्धा टाइमलाइन

तुमच्या प्रतिभेला ओळख मिळवून द्या! डिस्कव्हर नाशिक कुंभ २०२७ च्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे व विशेष सन्मान मिळवण्याची संधी मिळवा.

  • स्पर्धेची सुरुवात: ३१ ऑक्टोबर २०२६

  • नोंदणी सुरू: ८ नोव्हेंबर २०२६

  • नोंदणी अंतिम दिनांक: ३१ जानेवारी २०२७

०३

आकर्षक बक्षिसे आणि सन्मान

तुमच्या सर्जनशीलतेला ओळख मिळवून द्या! डिस्कव्हर नाशिक कुंभ २०२७ च्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा, प्रतिभा दाखवा आणि आकर्षक बक्षिसे व विशेष सन्मान मिळवण्याची संधी मिळवा.

  • आकर्षक बक्षिसे आणि गिफ्ट

  • प्रत्येक सहभागी गटासाठी प्रमाणपत्र

  • तुमची सर्जनशीलता दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ

श्रद्धा, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव

नाशिकच्या गौरवासाठी, सिंहस्थाच्या वैभवासाठी

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ एक पर्व नाही, तर नाशिकचा वारसा, संस्कृती आणि ओळख जगासमोर मांडण्याची ऐतिहासिक संधी आहे. फोटोग्राफी, व्हिडिओ, कला, डिझाईन आणि लेखनाच्या माध्यमातून नाशिककर, विद्यार्थी, युवा, महिला आणि नागरिक या प्रवासाचा भाग बनू शकतात.

नाशिक उलगडताना...

सिंहस्थापासून आधुनिक नाशिकपर्यंत...

सिंहस्थ कुंभमेळा, नाशिकचा इतिहास, संस्कृती, पर्यटन, आध्यात्मिक वारसा आणि आधुनिक विकासावरील माहितीपूर्ण लेख वाचा.

कुंभमेळ्यातील अखाडे

नाशिक सिंहस्थ कुंभ २०२७: भव्य धर्मध्वजारोहण सोहळा

नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे एकाच वेळी धर्मध्वज उभारून सिंहस्थ पर्वाची मंगलमय सुरुवात केली जाणार आहे.

श्रद्धा संस्कृती आणि मानवतेचा संगम

नाशिक कुंभ २०२७ मधील शंखनाद:

नाशिकमध्ये होणाऱ्या भव्य सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी सुरू असताना, शहराने आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची एक अनोखी झलक जगासमोर सादर केली आहे.

प्रमुख स्नान पर्वण्या

सिंहस्थ कुंभ २०२७: प्रमुख स्नान पर्वण्या आणि त्यांचे महत्त्व

अमृत स्नान, शाही स्नान आणि इतर प्रमुख पर्वण्यांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या. सिंहस्थातील प्रत्येक स्नान पर्वणी श्रद्धेचा अद्वितीय अनुभव देते.